काकासाठी मटण घेवून आला होता पुतण्या, अचानक असे काय झाल की जागेवरच घातल्या गोळ्या? वाचा....
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीचे सहाय्यक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अमरावती पोलिस दलाचे सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) भरत गायकवाड यांनी सोमवारी त्यांची पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय ३५) यांची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर एसीपी गायकवाड यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले. पुण्यातील बाणेर परिसरात पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.भरत गायकवाड यांनी स्वत:वरही गोळी झाडून जीव दिला. पुण्यातील चतु:शृंगी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. भरत गायकवाड हे अमरावती पोलिसात एसीपी म्हणून कार्यरत असून त्यांचे कुटुंबीय पुण्यात राहत होते. ते नुकतेच सुट्टीत पुण्यात आपल्या घरी आले होते.चतु:श्रृंगी पोलीस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत. सध्या पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही नोट मिळालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार गायकवाड कुटुंबात काही कारणावरून वाद झाला होता. या हत्येमागील कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्नी मोनीवर गोळी झाडली, तेव्हा गोळीचा आवाज ऐकून त्यांचा पुतण्या दरवाजा उघडून खोलीत आला असता त्यांनी त्याच्यावरही गोळी झाडली. त्यानंतर त्यांनी स्वत:वरही गोळी झाडली. दीपक गायकवाड असे त्या पुतण्याचे नाव होते. तो धायरी येथे राहत होता, तर भरत गायकवाड यांचे कुटुंब बाणेर येथे राहत होते. भरत गायकवाड जेव्हा कधी बाणेरला यायचे तेव्हा पुतण्या दीपक गायकवाड त्यांच्यासाठी मटण घेऊन यायचा.
23 जुलै रोजीही त्याने काकांसाठी मटण आणले होते. पाऊस थांबल्यावर त्याला घरी जायचे होते. मात्र पाऊस थांबत नसल्याने तो घरी न जाता रात्री तेथेच थांबला. रविवारी रात्री 10 वाजता जेवण करून सर्वजण झोपी गेले. पहाटे काकांच्या खोलीतून गोळीबाराचा आवाज आला. तो आवाज ऐकून तो काकांच्या खोलीत गेला. त्यानंतर दीपकने दार उघडले असता ACP भरत गायकवाड यांनी त्याच्यावरही गोळी झाडली.
त्यावेळी गायकवाड यांचा मुलगा सुहासही तेथे होता. तोही खोलीत जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र गायकवाड यांनी त्याला सांगितले की, तू येथून निघून गेला नाहीस तर तुलाही गोळ्या घालू. यानंतर भरत गायकवाड याने स्वतःवरही गोळी झाडली. त्यांच्या मुलानेच या संपुर्ण घटनाक्रमाची माहिती दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.