गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्षपदी रावसाहेब पाटील यांची निवड
गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्टची संचालक मिटिंग संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सतीश सारडा यांचे अध्यक्षते खाली झाली, सदर मिटिंग मध्ये संस्थेचे दिवंगत चेअरमन कै. रंगराव इरळे (दाजी) यांचे निधन झालेने शोकसभा घेऊन रिक्त पदी नूतन चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील (आण्णा) विश्वस्थपदी श्री. अशोक इरळे व श्री. दिगंबर जगताप यांची एक मताने निवड करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक अॅडव्होकेट. श्री. उत्तमराव निकम यांनी चेअरमन यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला. तसेच उपाध्यक्ष यांनी विश्वस्त यांचा सत्कार केला.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्थ श्री. संजय चौधरी, श्री. सचिन चौधरी, श्री. नितीन सामंत श्री. प्रवीण कदम व इतर संचालक उपस्थित होते. सदरची संस्था ही सन २००५ रोजी स्थापन केलेली असून संस्थेमार्फत महिलांसाठी योगासन कराटे, महिलांचा हास्यक्लब, व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करीत असून हे गणेश नगर भागातील म.न.पा. हॉल मध्ये व ओपन जागेत उपक्रम राबवले जातात तसेच संस्थेच्या माध्यमातून ओपन जागेत लहान मुलांची खेळणी व ओपन जिम, नागरीक लहान मुलांच्या सोयी साठी विद्यमान नगरसेवक यांच्या प्रयन्तानातून बसविणेत आलेली आहेत. त्यामुळे या भागातील सर्वांची सोय संस्थेच्या माध्यमातून केलेली आहेत. तसेच संस्थेच्या नूतन चेअरमनच्या माध्यमातून इतर अनेक सामाजिक उपक्रम नागरिकांच्या सोयी साठी राबविण्याचा मानस आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.