Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कडेगावात हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोहरम ; गगनचुंबी ताबूत भेटी

कडेगावात हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोहरम ; गगनचुंबी ताबूत भेटी 


हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यामधील कडेगावमध्ये मोहरम आज उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने गगनचुंबी ताबूत भेटींचा अनोखा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी कडेगावमध्ये उपस्थिती लावली होती. गावातील हिंदू समाजाचे 7 आणि मुस्लिम समाजाचे 7 ताबूत असतात. आज मोहरम दिवशी हा सोहळा दरवर्षीप्रमाणे उत्साहात संपन्न झाला. कडेगाव शहरातील जुने एसटी स्टँड चौकात ताबूत भेटी पार पडल्या.

मोठ्या जल्लोषात गगनचुंबी ताबूत भेटींचा हा लक्षणीय सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कनार्टक राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. याठिकाणी पार पाडणारा मोहरम सण हा प्रतीक आहे.

गगनचुंबी ताबूत अर्थात डोले.

हे ताबूत बांधण्याचे काम सर्व समाजातील लोकांच्या माध्यमातून करण्याची प्रथा आहे. मुस्लिम धर्मीयांच्या बकरी ईद नंतर या ताबूत बांधणीच्या कामाला सुरवात होते. विशेष म्हणजे या दीडशे फुटी उंच बांधण्यात येणाऱ्या ताबूता मध्ये कोठेही गाठ मारण्यात येत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.