दोषी आढळल्याने सिव्हिल सर्जन निलंबित… आरोग्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : कोरोना काळात परभणी जिल्हा रूग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केलेल्या वित्तीय अनियमितेची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये ते दोषी आढळल्याने त्यांचे निलंबन केले असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विधानपरिषदेत केली. याबाबतचा प्रश्न सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना प्रा.डॉ.तानाजी सावंत बोलत होते.
मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, परभणीचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी त्यांच्या कार्यकाळात वित्तीय अनियमितता केली आहे. त्याचे लेखापरिक्षणही करण्यात आले आहे. खरेदी केलेल्या साहित्याची नोंद नसणे, राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी खर्चासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केला नाही. खरेदी प्रक्रियेच्या नियमांचे पालन न करणे, खर्च करण्यात आलेल्या रकमेपैकी काही देयके सादर न करणे, कोरोना कालावधीत नियुक्त डॉक्टरांचे नियुक्तीपत्र उपलब्ध न करणे, ४ कोटी ७२ निधीपैकी ५१ लक्ष निधीचे देयक सादर न करणे, लॉगबुक गहाळ असणे, अशा बाबी आढळून आल्या आहेत, अशी माहिती मंत्री डॉ. सावंत यांनी दिली.मुंबईतील अंधेरी एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय ऑगस्टअखेर सुरु करणार – आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत
मुंबईतील अंधेरी पूर्व एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय ऑगस्टअखेर सुरु करणार असल्याचे उत्तर आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात विधानपरिषदेत दिले. मुंबईतील अंधेरी (पूर्व) एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय बंद असल्याबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत बोलत होते.
प्रा.डॉ.तानाजी सावंत म्हणाले की, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मुंबईतील अंधेरी (पूर्व) एम.आय.डी.सी.मधील कामगार रूग्णालय ऑगस्टअखेर सुरु करणार आहोत. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सचिन अहिर, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.