सांगली महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण दिल्लीत आंतरराष्ट्रीय युथ अवॉर्डने सन्मानित
सांगली महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांना नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये आंतरराष्ट्रीय कलाम युथ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या अवॉर्डसाठी दीपक चव्हाण यांच्या संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव निवड झाली होती.
दीपक चव्हाण यानी 2018 पासून आपल्या शोले स्टाईल गाडीवरून स्वच्छता अभियानासह विविध सामाजिक उपक्रम हाती घेत समाजामध्ये प्रबोधन जनजागृती केली आहे. कोरोना काळात त्यांनी 555 दिवस फिरून 10 हजार किलोमीटरचा प्रवास करीत 350 हुन गावात जाऊन लोकांना दिलासा देण्याचे काम केले. भारत देशाच्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 75 ठिकाणी देशगीतांचे कार्यक्रम सादर केले. महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून माझी वसुंधरा आभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी काम केले आहे. याचबरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबविले आहेत. या सर्व कार्याची दखल घेत शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांची ख्वाब फाऊंडेशन इंडिया या संस्थेकडून आयोजित आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये अध्यक्ष मुन्नाकुमार यांच्याहस्ते आंतरराष्ट्रीय कलाम युथ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या अवॉर्ड मुळे सांगलीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या अवॉर्ड बद्दल सर्व स्तरातून दीपक चव्हाण यांचे अभिनंदन होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.