स्वयंपाकावरून सतत टोमणे मारून हैराण केले तरूणीची आत्महत्या!
कौटुंबिक कामावरून विवाहितेचा सतत मानसिक व शारिरीक छळ केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. अश्विनी बाळू पवार (वय २२, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पुणे : कौटुंबिक कामावरून विवाहितेचा सतत मानसिक व शारिरीक छळ केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. अश्विनी बाळू पवार (वय २२, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनीची आई सुनंदा पवार (वय ४७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांना स्वयंपाक नीट जमत नाही, ती भांडी घासत नसल्याने पती, सासू, सासरे, दीर यांनी टोणे मारले होते. तिचा शारिरिक व मानसिक छळ करण्यात आल्याने तिने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीला टोमणे मारण्यात आल्याने, तसेच तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केल्याने आत्महत्या केल्याचे सुनंदा यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.