सत्यपाल मलिक यांचा खोचक सल्ला; "त्यांनी स्वत:हून सत्तेतून पायउतार व्हावं..."
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मत मांडताना कधीही मागे हटले नाहीत. मोदी सरकारच्या काळात राज्यपाल मिळालेले असतानाही, त्यांनी आपली मते रोखठोकपणे मांडली. पुलवामामध्ये भारतीय जवानांवर घडलेल्या हल्ल्याबाबत सत्यपाल मलिक यांनी धक्कादायक विधान केले होते. त्यानंतर आता सत्यपाल मलिक यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
सत्यपाल मलिक यांच्या ४० सेकंदांच्या व्हिडीओमध्ये त्यांच्या तोंडून अशी विधान येत आहेत, "मला भिती आहे की हे लोक काही तरी नवा कुरापत करू शकतात.. . जसं की राम मंदिराजवळ स्फोट घडवून आणणे, भाजपाच्या एखाद्या माणसाची हत्या घडवून आणणे. हे लोक अशी काम नक्की करू शकतात. जे लोक पुलवामा प्रकरण घडवून आणू शकतात, ते काहीही करू शकतात. त्यांना संसदेची काहीही चिंता नाही. हे लोक चुकीच्या मार्गावर आहेत. त्यांच्यासाठी हेच उचित असेल की त्यांनी स्वत:हून सत्तेतून पायउतार व्हावे. कारण तसे न केल्यास त्यांना नक्कीच हार पत्करावी लागेल. मला खात्री आहे की २०२४ ला या लोकांना यश मिळणार नाही.
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी व्हिडिओ शेअर केला आणि म्हणाले, 'काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी किती भयानक गोष्ट सांगितली. अनेक काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. युवक काँग्रेसने सरकारवर निशाणा साधत 'बनावट देशभक्तीच्या नावावर मते मागणे बंद करा' असे म्हटले आहे. मात्र, सोशल मीडियावर अनेकांनी मलिक यांच्यावरही राग व्यक्त केला आला. बलवंत सिंह राणा यांनी लिहिले की, 'त्यांना गव्हर्नरपद देणे ही चूक होती. त्यामुळे त्यांच्या विधानामुळे संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.