स्वप्नगंध साहित्य समूह प्रस्तुत ,सौ.प्रणाली म्हात्रे यांनी संपादन केलेल्या"स्मरणसुगंध" पुस्तकाचा अनावरण सोहळा आज संपन्न झाला.या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून लाभलेले जेष्ठ साहित्यिक श्री.साहेबराव ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण झाले.माननीय सहित्यिका दीपा वणकुद्रे यांनी उत्तम रीत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.साहित्यिका सौ.योगिता तकतराव,सौ.दीपा पराडकर आणि सौ.प्रिया गावडे यांनीही आपल्या प्रतिक्रिया कार्यक्रमात व्यक्त केल्या.
मधुर,रसाळ मराठी भाषेस आपल्या अभ्यासपूर्ण आणि अलौकिक साहित्याने समृध्द करणाऱ्या जेष्ठ साहित्यिकांचा गौरव व्हावा या उद्देशाने त्यांना आदरांजली म्हणून स्मरणसुगंध" या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली.
एकूण अठरा जेष्ठ साहित्यिकांचा जीवनप्रवास वर्णन करणाऱ्या काव्यरचना या पुस्तकात आहेत.स्वप्नगंध साहित्य परिवारातील बहुतांश सारस्वतांच्या उत्तम रचना यात समाविष्ट केल्या आहेत.हे पुस्तक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.