Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

या अभिनेत्रीने 75 वर्षाच्या वृध्दाला 11 लाखाला लुबाडले ; नग्नावस्थेतील फोटो दाखवून केले ब्लॅकमेल

या अभिनेत्रीने 75 वर्षाच्या वृध्दाला 11 लाखाला लुबाडले ; नग्नावस्थेतील फोटो दाखवून केले ब्लॅकमेल 


टेलिव्हिजन विश्वातून एक धक्काडायक बातमी समोर आली आहे. एक टेलिव्हिजन अभिनेत्री आणि तिच्या मित्रावर एका ७५ वर्षांच्या भारतीय सैन्यातील माजी अधिकाऱ्याला फसवून त्यांना ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. पठाणमथिट्टा इथे राहणारी मल्याळम अभिनेत्री नित्या ससी आणि तिचा मित्र बिनू यांना नुकतंच कोल्लम येथे पोलिसांनी अटक केली आहे.

७५ वर्षीय भारतीत सैन्यातील माजी अधिकारी हे केरळ युनिव्हर्सिटीमध्ये कामाला असून तिरुवनंतपुरम मधील एका छोट्याशा शहरात ते वास्तव्यास आहेत. अभिनेत्री ससी ही स्वतः एक वकीलही आहे आणि २४ मे रोजी घर भाड्यावर घेण्यासबंधी तिचं त्या वृद्ध सैन्यदलातील माजी अधिकाऱ्याशी फोनवर संभाषण झालं होतं.

त्यानंतर तिने त्यांच्याशी मैत्री केली अन् ती वारंवार त्यांच्या घरीदेखील येऊ लागली,. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, “काही दिवसांनी एकदा तिने घरी येऊन त्या अधिकाऱ्याला कपडे काढण्यासाठी धमकावले, अन् नंतर तिचा मित्र बिनूने त्या दोघांचे मोबाइलमध्ये नग्न अवस्थेतील अश्लील फोटोज काढले.”

त्यानंतर त्या दोघांनी त्या वृद्ध व्यक्तीकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. याबरोबरच मोबाइलमधील नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीदेखील दिली. सातत्याने धमक्या मिळाल्याने पीडित व्यक्तीने त्यांना ११ लाख रुपये देऊन टाकले, पण तरी त्यांनी आणखी पैशांसाठी त्या वृद्ध व्यक्तीला धमकावणे सुरूच ठेवले. अखेर याला कंटाळून त्यांनी या दोघांच्या विरोधात परावुर येथील पोलिस चौकीत तक्रार नोंदवली. नित्या आणि बिनू दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. लवकरच त्यांना कोर्टासमोर उभं केलं जाईल असंही सांगितलं जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.