सर्वात मोठे सेक्स स्कँडल, विद्यापीठातील विद्यार्थीनीचे 5500 अश्लील व्हिडीओ, मोठी खळबळ
आर्थिक संकट, दहशतवादी कारवाया यामुळे होरपळत असलेल्या पाकिस्तानमध्ये महिलांची स्थिती खूप वाईट आहे. येथे प्राथमिक शाळेतील मुली असोत वा विद्यापीठात शिकत असलेल्या तरुणी असोत, कुणीही सुरक्षित नाही आहेत.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये एका मोठ्या सेक्स स्कँडलचा भांडाफोड झाला असून, त्यामुळे इस्लामाबाद, लाहोरपासून कराचीपर्यंत खळबळ उडाली आहे. हे जगातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल असल्याचेही सांगण्यात येत आहे. यामध्ये तब्बल ५५०० कॉलेज विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ समोर आले आहेत. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.पाकिस्तानमधील बहावलपूर विद्यापीठात नेमकं काय घडलंय, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.विद्यापीठामधील विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ समोर आले आहेत. या धक्कादायक प्रकारामागे विद्यापीठातील चीफ सिक्युरिटी ऑफिसर आणि इतर काही प्राध्यापक सहभागी होते. चिफ सिक्युरिटी ऑफिसरच्या मोबाईलमधून ५५०० अश्लील व्हिडीओ आणि फोटो मिळाले आहेत. हे अश्लील व्हिडीओ आणि फोटो विद्यापीठातील विद्यार्थिनींचे आहेत. तसेच पोलिसांना तपासादरम्यान, मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठाही सापडला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या बहावलपूर विद्यापीठामध्ये संपूर्ण पाकिस्तानमधून विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यापीठामध्ये सुमारे ५० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेतात. पाकिस्तानमधील उच्च शिक्षण आयोगाने २०१९ मध्ये या विद्यापीठाचा देशातील तिसरे सर्वात यांचे विद्यापीठ असा उल्लेख केला होता. दरम्यान, पाकिस्तानमधील विद्यापीठात घडलेल्या सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलची जगभरात चर्चा होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.