तोंडाच्या कर्करोगाने वाढवली चिंता, देशातील 'या' जिल्ह्यात दररोज सापडतो 1 रुग्ण
विडी, सिगारेट असो वा मावा गुटखा, यासगळ्यांवर धूम्रपान जीवघेणा आहे असे लिहिलेले असते. धूम्रपान केल्यामुळे कॅन्सर सारखा जीवघेणा आजार होऊ शकतो, परंतु असे असूनही लोक धूम्रपान करतच त्याचाच परिणाम असा झाला आहे की, आता धुम्रपानामुळे होणारे आजार आता घरापर्यंत पोहोचू लागले आहेत. धूम्रपान ज्याप्रकारे फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतो, तसाच तो तोंडाच्या कर्करोगाचेही कारण ठरताना दिसत आहे. रोहतकच्या डेंटल मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत. तंबाखूचे सेवन यासाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत असून यामुळे दररोज एक तरी जण तोंडाच्या कर्करोगाला बळी पडत आहे.
हरियाणातील रोहटकच्या ग्रामीण भागात हुक्क्याचे प्रमाण इतके आहे की लोक पंचायती सन्मानाचे प्रतिक मानून ते बिनधास्तपणे पितात. या एका हुक्क्याचा धूर 20 सिगारेटच्या बरोबरीचा असतो. पुरुषांसोबत, तरुण मुले आणि महिला देखील सिगारेट आणि हुक्का पिण्याच्या आहारी गेले आहेत. दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय तिवारी आणि प्राध्यापक अंजू यांनी सांगितले की, धूम्रपानामुळे तोंडाचा कर्करोग झपाट्याने पसरत आहे.दर महिन्याला सुमारे 30 ते 40 रुग्ण येथे येतात, ज्यांना एकतर तोंडाचा कर्करोग झाला आहे किंवा ते कर्करोगापूर्वीच्या टप्प्यावर आहेत. तोंडाचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे इथे शक्य नाही, पण कर्करोगापूर्वीची लक्षणे एखाद्यामध्ये आढळून आली तर त्यावर नियंत्रण मिळवता येते. तोंडाचा कर्करोग हा आजार इतका धोकादायक आहे की यामध्ये रुग्णाचे तोंड, घसा, जीभ, हिरड्या इत्यादींवर वाईट परिणाम होतो आणि त्यावर कोणताही इलाज नाही. धुम्रपान सोडण्यात काही जणांना यशही आले असले तरी त्यावर नियंत्रण न ठेवल्यास आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.