आईनेच मुलीला 100 पुरूषा बरोबर डेट करण्यास सांगितले, काय कारण आहे वाचा
आजकालच्या जीवनात लग्न करणं आणि ते टिकवून ठेवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. वडिलच आपल्या मुलीसाठी मुलगा निवडण्याचा काळ आता गेला. मुलींच्या इच्छेविरूद्ध त्यांचं लग्न लावून दिलं जात होतं.
आधीची नाती जास्त काळ टिकतही होती. पण आजकाल तरूण आणि तरूणी एकमेंकाना समजून घेतल्यावरच लग्न करतात. यासंबंधी एक धक्कादायक घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. इथे एका आईनेच आपल्या मुलीला 100 पुरूषांना डेट करण्याची परवानगी दिली आहे.
आईच्या या निर्णयाने मुलगीही अचंबित झाली होती. सध्या ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. 100 पुरूषांसोबत डेट करण्याचा खुलासा तरूणीच्या बहिणीने केला. तरूणीच्या बहिणीने सांगितलं की, तिने 100 पुरूषांना एक वर्षाच्या आतच डेट केलं.
यासाठी तिच्या आईने तिला 500 डॉलरही दिले होते. जे भारतीय करन्सीनुसार 41 हजार रूपये होतात. पैसे देताना तिची आई तिला म्हणाली होती की, हे पैसे संपले तर कळव, पण 100 पुरूषांना डेट केल्यावरच घरी परत ये. तरूणीची बहीण एलिस कॅरोलिनने याचा खुलासा टिकटॉकवर केला आहे.एलिसने व्हिडिओत सांगितलं की, 100 पुरूषांना डेटिंग केल्यानंतर तरूणी आणि तिच्या बहिणीने सेलिब्रेट केलं. एलिसने व्हिडिओमध्ये त्या पुरूषांच्या नावांची लिस्टही शेअर केली ज्यांच्यासोबत तिने डेटिंग केलं. आता हे जाणून घेऊ की, आईला का असं वाटत होतं की, तिच्या मुलीने 100 पुरूषांना डेट का करावं. रिपोर्ट्सनुसार, आईची अशी ईच्छा होती की, लग्नानंतर मुलीच्या मनात पुरूषांबाबत काही भीती राहू नये म्हणून तिने असं केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.