Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सागंली ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे 1 महिला व तीची 1 मुलगी वाचली

सागंली ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे 1 महिला व तीची 1 मुलगी वाचली 


सांगली ग्रामीणचे पोलीस हवालदार अक्षय माने व पोलीस शिपाई रोहित साखरे यांच्या धाडसामुळे व  सतर्कतेमुळे आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या मायलेकींना रोखण्यात यश आले आहे. त्यांचे या धाडसाचे सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी कौतुक केले आहे.

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवलदार अक्षय माने शिपाई रोहित साखरे हे पेट्रोलिंग करत असताना बीट अंमलदारांचा त्यांना फोन आला. अंकलीनदी पुलावर आत्महत्या करण्यासाठी एक महिला व मुलगी प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखण्याचे आव्हान केले .तात्काळ माने व साखरे यांनी आपली नदी पुलाकडे धाव घेतली .आत्महत्या करण्यासाठी मायलेकी नदीपात्रात पुढे जात असतानाच  माने,साखरे यांनी त्या दोन्ही महिलांना धाडसने पकडले. त्यांना ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले.

ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी अधिक तपास केला असता हरिपूर रोडवर राहणारे या कुटुंबात घरगुती वादामुळे आम्ही आत्महत्या करण्यासाठी  नदीपुलावर गेल्याचे सांगितले . पोलीस निरीक्षक गायकवाड व अक्षय माने यांनी त्या दोन्ही महिलांचे समुपदेशन करून व मन परिवर्तन करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.  सांगली ग्रामीणचे अक्षय माने रोहीत साखरे यांच्या सतर्कतेमुळे दोन जिव वाचल्याने त्यांचे व सांगली ग्रामीणच्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.