रिलायन्सवरील दरोड्यातील आरोपी पकडल्याची अफवाच
सांगली: शहरातील माकेर्ट याडर्जवळील वसंत कॅलनीत असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र या दरोड्यातील कोणालाही अद्याप अटक करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दरोड्यातील आरोपी पकडल्याची ती अफवाच असल्याचे सिद्ध झाले आहे.
रविवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान रिलायन्स ज्वेल्सवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबारही केला. या दरोड्यात सोन्या चांदीचे दागिने तसेच मूल्यवान हिरे, रोकड, मोबाईल असा तब्बल १४ कोटींचा मुद्देमाल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना घडल्यानंतर सांगलीत खळबळ उडाली आहे. दरम्यान सांगली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे.
दरोडा पडल्यानंतर काही वेळातच सांगली एलसीबीची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे पथक सोलापूर जिल्ह्याकडे रवाना झाले होते. सांगोला ते मंगळवेढा दरम्यान तेथील पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी एक चारचाकी गाडी पोलिसांचे बॅरिकेटस तोडून भरधाव वेगाने निघून गेली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून ती गाडी अडवली. त्यातील लोकांची चौकशी करण्यात आली. तसेच गाडीची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये दारू सापडली. त्यामुळे सोशल मिडियावर फिरत असलेला सांगलीतील दरोड्यातील आरोपी पकडल्याचा मेसेज खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.