आटपाडी तालुक्यात कोयता गँगचा शिरकाव
जिल्ह्यामध्ये कोयता गँगची दहशत असली त्याचे लोन आता ग्रामीण भागातही पहावयास मिळत असून आटपाडी तालुक्यात कोयता गँगचा चा शिरकाव झाला असून कोयत्याचा धाक दाखवत फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याकडून एक लाख १७ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यात चैतन्य मायक्रो फायनान्स कंपनी असून सदर कंपनी कडून महिला बचत गटांना कर्जाचा पुरवठा केला जातो. त्याची वसुली करण्यासाठी कंपनीने वसुली अधिकारी नेमले आहेत. कंपनीचे वसुली अधिकारी अजय लोहकरे हे दिनांक ०५ रोजी दुपारी ३.०० च्या सुमारास बचत गटाची बसुली झालेली रुउक घेवून निंबवडे मार्गे आटपाडी येत असताना लक्ष्मी मंदिर जवळ ते आले असता पाठीमा मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात इसमांनी अजय लोहकरे यांची सॅक ओढण्याचा प्रयत्न केला असता अजय लोहकरे हे गाडीवरून खाली पडले.
यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांची सॅक जबरदस्तीने काढून केली. यामध्ये महिला बचत गटाची जमा झालेली एक लाख सतरा हजाराची रोकड तसेच त्यांच्या गाडीचे आरसी बुक, आधार कार्ड, एटीएम कार्ड लंपास केले. या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्हाच अधिक तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.