Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली ते पुणे व पुणे ते सांगली धावणाऱ्या नवीन रेल्वे गाडीचे सांगली रेल्वे स्टेशनवर नागरिक जागृती मंच तर्फे स्वागत/सत्कार

सांगली ते पुणे व पुणे ते सांगली धावणाऱ्या नवीन रेल्वे गाडीचे सांगली रेल्वे स्टेशनवर नागरिक जागृती मंच तर्फे स्वागत/सत्कार


सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने वारंवार सांगली रेल्वे स्टेशन वरून पंढरपूर सोलापूर बेळगाव पुणे मुंबई गुजरात राजस्थान कर्नाटक जाणार्या रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती.

त्याला अनुसरुन रेल बोर्डाने सांगली रेल्वे स्टेशनवर मैसूर-उदयपूर पॅलेस क्वीन या राजस्थान व कर्नाटक जाणार्या महत्वपर्ण गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा दिला. त्याचबरोबर जोधपूर-बेंगलोर एक्सप्रस या लांब पल्ल्याच्या गाडीला देखील सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा दिला आहे.

आता सांगली रेल्वे स्टेशनवर अनेक गाड्या थांबत असल्याने सांगली तसेच कोल्हापूर जिल्हातील प्रवासी सांगली स्टेशनवरुन राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा, दिल्ली, उतरप्रदेश, मध्य प्रदेश जाणार्या गाड्या पकडतात

आता खास सांगली जिल्हातील लोकांना पुणे जाण्याची सोय व्हावी यासाठी मध्य रेल्वेने सांगली-पुणे दरम्यान मिरज-सांगली-पुणे एक्सप्रेस ही जलद गाडी दर मंगळवारी सुरू केली आहे.  सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, तासगाव, आष्टा येथील लोकांना सांगली स्टेशनवरुन पुणे जाता येईल
पुणे-सांगली व सांगली-पुणे रेल्वे गाडी दर मंगळवारी सुरू झाली

सांगलीतून पुण्याला जाणार्या नवीन रेल्वे गाडीचा सत्कार समारंभ सांगली रेल्वे स्टेशनवर आयोजित करण्यात आला.  या सत्कार समारंभासाठी सांगली रेल्वे स्टेशन वर उपस्थित रहावे ही विनंती आहे.

मंगळवार ता ६ जून रोजी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच तर्फे श्री सतीश साखळकर व इतर पदाधिकारी यांनी गाडीचे ईंजिन ड्रायवर व अन्य कर्मचार्याचा सांगली स्टेशनवर सत्कार केला

सतीश साखळकर सोबत प्रदीप कांबळे,आनंद देसाई,महेश पवार,हरिभाऊ माने,कोंडीबा शिंदे,विष्णू चोपडे,शिवाजी माळी,बाळासाहेब बंडगर, संभाजी वाडकर, महादेव घुटुगडे, विजय मोटे,गणेश माने, पवन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

या गाडीमुळे एसटी बस पेक्षा जलद पुणे-सांगली रेल्वे सेवा उप्लब्ध झाली आहे. 

*गाडी ०१४२३ पुणे-सांगली-मिरज एक्सप्रेस*
👉 *पुणे स्टेशन मंगळवारी सकाळी ८ वा सुटेल*
👉 *सांगली स्टेशन मंगळवारी दुपारी १२:२७ वा पोहोचेल*

*गाडी ०१४२४ मिरज-सांगली-पुणे एक्सप्रेस*
👉 *सांगली रेल्वे स्टेशन मंगळवारी दुपारी २:४० वा सुटेल*
👉 *पुणे स्टेशन मंगळवारी संध्याकाळी ७:४० वा पोहोचेल*

सांगली स्टेशन ते पुणे ६६३आरक्षित सिटची तिकीटे उप्लब्ध आहेत. तसेच ५०० अनारक्षित तिकीटे उपलब्ध असून एकूण १२०० प्रवासी सांगली ते पुणे प्रवास करु शकतील.
👉स्लीपर क्लास Sleeper - 350 सिटची तिकीटे
👉एसी थ्री टीयर - 250 सिटची तिकीटे
👉एसी टू टीयर - 63 सिटची तिकीटे
*सांगली-पुणे अनारक्षित तिकीट दर रु १००*
*सांगली-पुणे स्लीपर तिकीट दर रु २८५*
*सांगली-पुणे एसी3 टीयर तिकीट दर रु ७७०*

या गाडीला सांगली, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी व पुणे हे थांबे आहेत. पहिल्याच दिवशी सुमारे 150 पेक्षा जास्त प्रवाशांनी सांगली रेल्वे स्टेशन वरून पुणे जाण्यासाठी ही गाडी पकडली. गाडीचे तिकीट मोबाईल फोनवर www.irctc.co.in वेबसाईट व IRCTC मोबाईल ॲप्लिकेशन द्वारा बुक करता येते. पुणे स्टेशन व सांगली रेल्वे स्टेशनवर तिकीट बुक करता येते ४ महिने अगोदर पासून तिकीट बुक करू शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.