Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऊरसामध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन तरूणाचा डान्स; धक्कादायक प्रकार

ऊरसामध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन तरूणाचा डान्स; धक्कादायक प्रकार 


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार हा अहमदनगरच्या फकीरवाडा भागातील आहे. फकीरवाड्यात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं. या उत्साहादरम्यान काही युवक औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते.
संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. संबंधित प्रकार हा रविवारी रात्रीचा असल्याची माहिती समोर येत आहे. तरुण औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन नाचले असल्यामुळे यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

ती व्यक्ती एमआयएमची?

काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी इम्तियाज जलील यांनी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं म्हटलं होतं. पण जलील आणि एमआयएम यांचं औरंगजेबाबद्दलचं प्रेम लपून राहिलेलं नाही. कारण एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादमध्ये आले होते तेव्हा त्यांनी औरंगजेबाच्या समाधीस्थळी जात पुष्पहार अर्पण करत नमस्कार केला होता.

संबंधित घटनांनंतर वारंवार अशा घटना घडत आहेत. आतादेखील अहमदनगरमध्ये मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो झळकवून नाचण्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आलाय. ज्या युवकाने हातात औरंगजेबाचा फोटो धरलाय तो एमआयएमचा शहराध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगरमधील या घटनेमुळे शहरातील वातावरण तापलं आहे. प्रशासनाने देखील या घटनेची दखल घेतली आहे. प्रशासनला घटनेचं गांभीर्य माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराभवासाठी औरंगजेब आला होता. औरंगजेब किती क्रूर होता हे सर्वाश्रूत आहे. त्याने आपल्या सख्ख्या भाऊ आणि वडिलांना सोडलं नव्हतं. पण तरीही त्याच्याबाबत काही लोकांच्या मनात इतका पुळका का आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

‘कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही’, फडणवीसांची प्रतिक्रिया

दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “औरंगजेबाचं फोटो झळकवणं सहन केलं जाणार नाही. औरंगजेबाचं फोटो कोणी झळकवत असेल तर ते मान्य केलं जाणार नाही. या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.