Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'आरएसएस' सर्व्हेनुसार मध्यप्रदेशात कॉँग्रेसचे सरकार स्थापन होणार; कॉँग्रेसचा दावा

'आरएसएस' सर्व्हेनुसार मध्यप्रदेशात कॉँग्रेसचे सरकार स्थापन होणार; कॉँग्रेसचा दावा


कर्नाटकनंतर मध्य प्रदेशातही काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा दावा करण्यात आला आहे. 

वाचा, काय म्हटलं आहे काँग्रेसने आपल्या ट्विट मध्ये?

या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक सर्वे समोर आला आहे. या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर भाजपच्या जागा ५५ पेक्षा कमी जागा मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे. 

2018 मध्ये काँग्रेसचे 15 महिन्यांचा कार्यकाळ आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासारख्या निर्विवाद आणि अनुभवी नेत्याचा पाठिंबा आहे. यांच्या माध्यमातून काँग्रेस मध्य प्रदेशच्या लोकांपर्यंत पोहोचत आहे. काँग्रेसला  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. या निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे. कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेशात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

"मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सर्व्हे समोर आले आहेत. यात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. भाजपाला केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. काँग्रेसकडे २०१८ च्या १५ महिन्यांचा कार्यकाळाचा अनुभव आणि कमलनाथ यांच्यासारखा निर्विवाद व अनुभवी नेता आहे. हे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेसमोर जात आहे." 

"भाजपाची १८ वर्षांची देणेदारी आणि अपूर्ण घोषणांमुळे जनतेत सरकारविरोधी मोठी लाट तयार झाली आहे. मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले आहेत. सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहे. इतकंच नाही, तर सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं दिसत आहे." असा दावा काँग्रेसने केला आहे.

आरएसएसने केलेल्या या दाव्यावरून भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.हा सर्व्हे समोर आल्यानंतर विद्यमान ६० टक्के आमदारांचं तिकीट कापण्याच्या सूचनाही भाजपने दिल्या आहेत. असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

आता पर्यंतचे 6 सर्वेक्षण

जानेवारी २०२३

संघाचा एक सर्व्हे सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात भाजप 103 जागांसह सरकारमधून बाहेर पडत आहे.

फेब्रुवारी २०२३

काँग्रेसचा अधिकृत सर्व्हे समोर आला असून त्यात भाजप ९५ जागांपर्यंत मर्यादित असल्याचे दिसत आहे.

मार्च २०२३

इंटेलिजन्सचा एक गोपनीय सर्व्हे लीक झाला होता ज्यामध्ये भाजपला 80 पेक्षा कमी जागा मिळत असल्याचे दिसत आहे.

एप्रिल २०२३

दैनिक भास्कर आणि ईएमएससह अनेक वृत्त गटांचे सर्वेक्षण प्रशासकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले, ज्यामध्ये भाजप 70 जागांपर्यंत मर्यादित आहे.

मे 2023

ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक सर्व्हे करण्यात आला होता ज्यामध्ये भाजपला फक्त 65 जागा मिळत असल्याचे दिसत आहे.

जून २०२३

नवभारत समाचारने एक सर्वेक्षण प्रकाशित केले असून त्यात भाजपला केवळ 55 जागांसह सत्तेतून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले आहे. वरील सर्व सर्वेक्षणांचे ट्रेंड असे दर्शवत आहेत की काँग्रेस झपाट्याने पुढे जात आहे आणि लोकांचा आवाज बनत आहे. दुसरीकडे भाजपची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. म्हणजेच यावेळी भाजपच्या जागा 50 पेक्षा कमी होणार हे स्पष्ट आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.