लिपीक खुर्ची घेऊन धावला वरीष्ठ अधिकाऱ्याच्या अंगावर जतमधील एका शासकीय कायार्लयातील प्रकार
सांगली : भेटीसाठी नेहमीच दूरची गावे का देतोस अशी विचारणा करणाऱ्या वरीष्ठ अधिकाऱ्याच्या अंगावर लिपीक चक्क खुर्ची घेऊन धावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जतमधील एका शासकीय कायार्लयात सोमवारी हा प्रकार घडल्याचे समजते. दरम्यान लिपिकाने मारण्यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यावर खुचीर् उगारल्याने खळबळ उडाली आहे.
जतमध्ये एक शासकीय कायार्लयात आवक-जावक पाहणारा तरूण लिपिक आहे. तर याच कायार्लयात निवृत्तीला ठेपलेले एक वरीष्ठ अधिकारी आहेत. आवक-जावक टेबल पाहणाऱ्या या तरूण लिपिकाकडे अधिकाऱ्यांना काम वाटप करण्याचीही जबाबदारी आहे. हा लिपिक संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्याला भेटीसाठी तालुक्यातील दूरची गावे नेहमीच देत असतो. सध्या उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यात जतसारख्या दुष्काळी तालुक्यातील गावांना भेटी देणे वयस्कर व्यक्तीला अडचणीचे ठरत आहे.हा तरूण लिपीक सातत्याने भेटीसाठी दूरची गावे देत असल्याने सोमवारी त्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला त्याबाबत विचारणा केली. त्यावर भडकलेल्या त्या तरूण लिपिकाने त्या अधिकाऱ्यांशी जोरदार वाद घातला. त्यानंतर खुर्ची उचलून चक्क त्यांना मारण्यासाठी धावला. कायार्लयातील अन्य लोकांनी मध्यस्थी केल्याने हा वाद काही काळाने मिटला. मात्र या तरूण लिपिकाने वरीष्ठ अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केलेल्या घटनेची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.