Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हृदयविकारासाठी सोमवार ठरतो ' घातवार' ,नवीन संशोधनातील माहिती

हृदयविकारासाठी सोमवार ठरतो ' घातवार' ,नवीन संशोधनातील माहिती


आठवड्यातील अन्‍य कोणत्‍याही वारापेक्षा सोमवारी येणारा हृदयविकाराचा झटका  हा अधिक प्राणघातक ठरण्‍याची शक्‍यता असते, असे नवीन संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. यापूर्वीही झालेल्‍या संशोधनात असा निष्‍कर्ष काढण्‍यात आला होता. ब्रिटिश कार्डिओव्हस्कुलर सोसायटी कॉन्फरन्समध्ये सादर केलेल्या संशोधनानुसार, हृदयविकाराचा सर्वात गंभीर प्रकार आठवड्याच्या इतर कोणत्याही दिवसांपेक्षा सोमवारी होण्याची शक्यता असते. या संशोधनात सोमवार आणि प्राणघातक हृदयविकाराचा झटका याच्‍यातील सांख्यिकीय संबंधावर प्रकाशझोत टाकण्‍यात आला आहे. जाणून घेवूया नवीन संशोधनातील निष्‍कर्षांविषयी…
आयर्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आणि आठवड्यातील वार यांचा परस्‍पर संबंध यावर संशोधन केले. संशोधनात सोमवारी आलेला हृदयविकाराचा झटका हा अधिक प्राणघातक असल्‍याची शक्‍यता १३ टक्क्यांनी वाढते असल्‍याचे निदर्शनास आले.

असे झाले संशोधन ?

बेलफास्ट हेल्थ अँड सोशल केअर ट्रस्ट आणि आयर्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जनमधील डॉक्टरांनी आयर्लंड बेटावरील १० हजार ५२८ रुग्‍णांच्‍या आरोग्‍याविषयी माहिती एकत्रित केली. यामध्‍ये २०१३ ते २०१८ या पाच वर्षांच्‍या काळात तीव्र हृदयविकाराचा झटका आलेल्‍या रुग्‍णांचे विश्‍लेषण करण्‍यात आले.

सोमवारी तीव्र हार्ट अ‍ॅटॅक का येतो?

सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असेत, असे यापूर्वी झालेल्‍या संशोधनात स्‍पष्‍ट झाले होते. तसेच याचे कारण शरीराच्या झोपेची किंवा जागे होण्याच्या चक्राशी संबंधित असल्याचे दिसून आले होते. या नवीन संशोधनाचे नेतृत्व करणारे कार्डिओलॉजिस्ट डॉ जॅक लाफन या संशाोधनावर प्रकाशित केलेल्‍या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "आम्हाला नवीन संशोधनात असे आढळले की, सोमवार हा आठवड्याची सुरुवात होणार वार असतो. या दिवशीमध्‍ये हृदयाला रक्‍तपुरवठा करणार्‍या मुख्य धमनी पूर्णपणे कठीण होण्‍याचे प्रमाण अधिक असल्‍याची शक्‍यता बळावते. 

सोमवारी हृदयाची मोठी धमनी पूर्णपणे ब्लॉक झाल्‍यानंतर येणार्‍या एसटी-सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन  या प्रकारचा झटका येण्‍याची शक्‍यता १३ टक्‍क्‍यांनी वाढते. STEMI हृदयविकाराच्या झटक्यांचे दर रविवारी अपेक्षेपेक्षा जास्त असल्‍याचे संशाेधनात आढळले. कामाच्या आठवड्याच्या सुरुवातीत सोमवारी होते.  हृदयविकाराच्या झटक्यांचा दर सोमवारी सर्वाधिक असल्‍याचे आढळले. सोमवार आणि आणि STEMI यांच्यात एक ठोस असा सांख्यिकीय संबंध आढळला आहे. यावर यापूर्वीही संशोधन झाले आहे. मागील अभ्यासातून मिळालेली माहिती वस्‍तुनिष्‍ठच असल्‍याचे नव्‍या संशाेधनामुळे पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले आहे.

हार्ट अ‍ॅटॅक  : भविष्यात अधिक जीव वाचवू शकू

नवीन संशोधनासंदर्भात ब्रिटनमधील ‘बीएचएफ’चे वैद्यकीय संचालक प्रोफेसर सर नीलेश सामानी यांनी सांगितले की, "हृदयविकारावरील नवीन सशोधनामुळे आठवड्याच्‍या वारांचा विचार झाला तर अधिक काळजी घेणे सोपे जाते. तसेच डॉक्टरांना प्राणघातक हृदयविकाराचा झटका आल्‍यानंतर रुग्‍णाची स्‍थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होणार आहे, यामुळे आम्ही भविष्यात अधिक जीव वाचवू शकू.”

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हृदयविकाराचा धोका अधिक

अमेरिकन हार्ट असोसिएशनने  यापूर्वी केलेल्‍या संशोधनात असे आढळून आले होते की, वर्षातील अन्‍य महिन्‍यांच्‍या तुलनेत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा सर्वाधिक मृत्यू होतो. दिनचर्या, झोपेचे आणि व्यायामाचे वेळापत्रक तसेच आहारातील बदल, वर्षाच्या त्या काळात लोकांना हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका असू शकतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.