राज्यातील 61 तहसिलदाराना पदोन्नती!
मुंबई : राज्यातील तब्बल 61 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये पुणे विभागातील दोघांचा समावेश आहे. पुणे विभागातील राजीव विश्वनाथ, अभिजित सावर्डे-पाटील यांचा समावेश आहे. कोकण विभागातील दोन अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर नाशिक विभागातील 4 तहसीलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे.
अमरावती विभागातील 21 तहसीलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर त्याखालोखाल नागपूर विभागातील 19 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. औरंगाबाद विभागातील 13 तहसीलदारांना पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती देण्यात आलेल्या बहुतांशी अधिकाऱ्यांना त्याच महसूल विभागात पदस्थापना देखील देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.