लग्नाच्या वरातीत नाचत असताना मुलीला उचलून नेत 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार
देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, बलात्कार तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. झारखंडच्या गुमला येथील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात 31 मे रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी शेजारच्या गावातील 19 वर्षीय ब्रिज मिंज याला अटक केली आहे.
त्याचवेळी दोन अल्पवयीन आरोपींना पकडून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. गुमला एसडीपीओ मनीष चंद्र लाल यांनी ही माहिती दिली. 31 मे रोजी पीडितेच्या गावात लग्नसमारंभ होता. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातून वरात आली होती. लग्नात वऱ्हाडी नाचगाण्यांमध्ये दंग होते. यावेळी शेजारील गावातील काही तरुणही तेथे पोहोचले होते. पीडित तरुणीही वऱ्हाडींचा डान्स पाहत होती. याचदरम्यान, शेजारील गावातील दोन मुलांनी डाव टाकला आणि मुलीचे तोंड बंद करुन तिला स्कूटीवरून आंब्याच्या बागेत नेले.
तिथून फोन करून आणखी तीन मित्रांना बोलावले. त्यानंतर सर्वांनी आलटून-पालटून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन सोडून देण्यात आले. पीडितेने घरी पोहोचून तिच्या कुटुंबीयांना झालेला त्रास सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले आणि पोलिसांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली. गुमला एसडीपीओ मनीष चंद्र लाल यांनी सांगितले की, पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह पोलिस स्टेशन गाठल्यानंतर एफआयआर दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जोमाने तपास सुरू केला. याप्रकरणी तीन आरोपींना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोन अल्पवयीन आहेत. दोघांनाही बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी 19 वर्षीय ब्रिज मिंजला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.