Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवारांच्या सांगण्यावरून भाजपात प्रवेश: पंचम कलानी यांचा गौप्यस्फोट

शरद पवारांच्या सांगण्यावरून भाजपात प्रवेश: पंचम कलानी यांचा गौप्यस्फोट


राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानंतरच आपण भाजपमध्ये गेलो होतो, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी केला. तसेच शहराची जबाबदारी कलानी कुटुंबाकडे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आव्हाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे कलानी कुटुंबाकडे राहिली. मात्र, गेल्या महापालिका निवडणुकीच्या काळात कलानी कुटुंबाने भाजप सोबत घरोबा केला. पंचम कलानी यांच्याकडे महापौरपद आले. या काळात पक्षाची जबाबदारी भरत गंगोत्री यांच्याकडे आली होती. गंगोत्री यांनी पक्षाच्या पडत्या काळात चार नगरसेवक निवडून आणून पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले होते. पक्षाचे नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून गंगोत्री यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, महापालिका सत्तेसाठी, आमदार व खासदार पदासाठी पप्पू कलानी हे सर्वांनाच हवे आहेत.

भाजपमध्ये कोंडी झाल्यानेच पुन्हा राष्ट्रवादीत

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी मार्गदर्शन करताना केलेल्या गौप्यस्फोटमुळे पुन्हा शरद पवार यांच्या भोवती संशयाचे धुके निर्माण झाले. गेल्या वर्षी अंटेलिया व रिजेन्सी हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत माजी आमदार पप्पू कलानी यांनी आपल्याला तुरुंगाबाहेर भाजपने नव्हे, तर महाविकास आघाडीने काढल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे पप्पू हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असल्याचे पुन्हा एकवार उघड झाले. दरम्यान, भाजपमध्ये कोंडी झाल्याने, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याचे पंचम यांनी सांगितले.

कलानी महलच्या पायऱ्या सर्वच पक्षाच्या नेत्यांची झिजवल्या आहेत. कलानी हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असल्याने, मुलगा ओमी कलानी, सून पंचम कलानी यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे मन वळवून पुन्हा राष्ट्रवादीत आणले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.