लट्टू होण्यासाठी रक्त पितात, या ठिकाणी विचित्र परंपरा
नवी दिल्ली : आजकाल लोकांना आपल्या शरीराची खूप काळजी असते. विशेषतः वजनाची. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक गोष्टी करत असतात. जीम, योगा, हेल्थी डाएट याच्या सहाय्याने ते स्वतःला फीट ठेवत असतात. याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चाललेली पहायला मिळतेय. मात्र जगात असंही एक ठिकाण आहे जिथे लोक लठ्ठ होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र ही गोष्ट खरी आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया.
जगात असं एक ठिकाण आहे जिथे लोक चरबी असणे हे शक्तीचे लक्षण मानतात. त्यामुळे लठ्ठ होण्यासाठी येथील लोक दुधात रक्त मिसळून ते निरोगी राहण्यासाठी पितात. आणि सर्वात जाड व्यक्तीला नायकाचा दर्जा दिला जातो. तो तिथे राज्य करतो. इथिओपियाच्या बोडी जमातीध्ये ही गोष्ट आढळून येते. त्यांची जीवनशैली आणि परंपरा अशा आहेत की, तुम्हीही जाणून थक्क व्हाल. ओमो व्हॅलीमध्ये राहणाऱ्या बोडी जमातीच्या गोष्टी एखाद्या थरारक चित्रपटापेक्षा कमी नाही. जगापासून आणि समाजापासून पूर्णपणे तुटलेले असूनही हे लोक आपल्या परंपरांशी अजिबात तडजोड करत नाहीत. या ठिकाणी एक विशेष प्रकारची स्पर्धा आहे, ज्याला कॅल म्हणतात. याद्वारे सर्वात जाड व्यक्तीची निवड केली जाते आणि शेवटी तोच नायक निवडला जातो. समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, केवळ अविवाहित पुरुषच स्पर्धेत भाग घेऊ शकतात
त्यांना 6 महिने वेगळ्या खोलीत ठेवले जाते. भरपूर खाणेपिणे दिले जाते जेणेकरून ते लठ्ठ होऊ शकतात. हे लोक 6 महिने गाईचे रक्तमिश्रित दूध पितात. कारण यामुळे ते लवकरच जाड होतील असा त्यांचा विश्वास आहे. या कालावधीत शारीरिक संबंध ठेवण्यास परवानगी नाही, प्रत्येक पुरुषाला संपूर्ण सहा महिने समान आहार दिला जातो. बोडी जमातीत गायींना पवित्र मानले जाते, त्यामुळे हे लोक त्यांना मारत नाहीत. त्याऐवजी भाल्याने किंवा कुऱ्हाडीने रक्तवाहिनी भोसकून रक्त घेतले जाते आणि नंतर ती जखम मातीने बंद केली जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.