दुबईला साखर निर्यातीच्या बहाण्याने पुण्यातील डॉक्टरने केली व्यवसायिकाची दीड कोटीची फसवणूक
पुणे : दुबई येथे साखर निर्यातीसाठी दहा टक्के अॅडव्हान्स घेऊन साखर निर्यात न करता पुण्यातील एका डॉक्टरने मुंबईच्या एका व्यावसायिकाची एक कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात हसन अली पुरोहित (वय ६२, रा. ओशिवरा पश्चिम, अंधेरी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून डॉ. उमेश कृष्ण जोशी (वय ६३, रा. रामकांता अपार्टमेंट, डहाणूकर कॉलनी) याच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. उमेश जोशी याची ओरा एंटरप्रायझेस ही कंपनी सदाशिव पेठेत आहे. फिर्यादी यांना दुबई येथे ५ हजार १८४ टन साखर निर्यात करायची होती. त्यासाठी जोशी याने पुरोहित यांच्याकडे दहा टक्के अॅडव्हान्स मागितले. त्यामुळे पुरोहित यांनी एक कोटी ३८ लाख ८४ हजार ८२६ रुपये (एक लाख ८६ हजार ६२४ अमेरिकन डॉलर) जोशी यांच्या खात्यात ऑनलाइन जमा केले. परंतु साखरेची निर्यात न करता फिर्यादीची फसवणूक केली.
तसेच, महेश पगडे यांना १० कोटींचे कर्ज देतो, असे सांगून त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे युनिट एकचे पोलिस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी पुढील तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.