सांगलीत महाविद्यालयीन तरुणांची मारामारी चार जण जखमी
सांगली : सांगली शहरातील एका कॉलेज परिसरात युवकांची किरकोळ कारणातून जोरदार मारमारी झाली. यामध्ये कुपवाड, ब्रम्हनाळ (ता. पलूस), जयसिंगपूर येथील चौघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर सांगलीतील सिव्हीलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, रात्री उशीरापर्यंत याबाबत शहरातील कोणत्याही पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
शहरातील एका महाविद्यालय परिसरात दोन गटात किरकोळ कारणातून वाद उफाळून आला. वाद टोकाला गेल्यानंतर काहींनी दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यात चौघे जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला दुखापत झाली आहे. जखमीना तातडी उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.