Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील १२ उपअधीक्षकांच्या पदस्थापनेत बदल तर सहाजणांच्या बदल्या

राज्यातील १२ उपअधीक्षकांच्या पदस्थापनेत बदल तर सहाजणांच्या बदल्या


मुंबई: राज्य शासनाने मंगळवारी पूवीर् करण्यात आलेल्या १२ उपअधीक्षकांच्या पदस्थापनेत बदल करण्यात आले आहेत. तर ६ उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे यांची पांढरकवडाचे पोलिस उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या सहीने मंगळवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.   

अकलूजचे उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांची श्रीरामपूर येथे बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील गुप्तवातार् विभागाचे उपअधीक्षक नितीन कटेकर यांची पुणे सीआयडीकडे बदली करण्यात आली आहे. रत्नागिरी येथील उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांची अक्कलकुवा येथे बदली करण्यात आली आहे. नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील शोभा पिसे यांची मुंबईत सहायक आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.  

यापूवीर् झालेल्या उपअधीक्षकांच्या बदल्यांमधील १२ जणांच्या पदस्थापनेत बदल करण्यात आले आहेत. मुंबईतील सहायक आयुक्त राजेंद्र मोकाशी यांची मीरा-भाईंदर येथे बदली करण्यात आली आहे. सातारा मुख्यालयाचे राजेंद्र शेळके यांची सातारा ग्रामीणकडे (कोरेगाव उपविभाग) बदली करण्यात आली आहे. अकोल्यातील मुख्यालयाचे उपअधीक्षक सरदार पाटील यांची सीआयडी पुणेकडे बदली करण्यात आली आहे. गडचिरोलीचे प्रशांत अमृतकर यांचीही पुणे सीआयडीकडे बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील स्वप्नील राठोड यांची धाराशीवला बदली झाली आहे. यवतमाळ मुख्यालयातील संजय पुजलवार यांची यवतमाळ उपविभागाकडे पदस्थापना करण्यात आली आहे. 

पिंपरी चिंचवडकडील प्रेरणा कट्टे यांची खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्राकडे पदस्थापना करण्यात आली आहे. निलंगा येथील दिनेशकुमार कोल्हे यांची सिल्लोड येथे तर शिडीर्तील संजय सातव यांची अहमदनगर मुख्यालयात पदस्थापना करण्यात आली आहे. जालन्याचे विक्रांत गायकवाड यांची मंगळवेढा येथे तर संदीप मिटके यांची शिडीर्चे उपअधीक्षक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या अश्विनी शेंडगे यांची साताऱ्यातील दहिवडीच्या उपअधीक्षक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.