प्रेमात नोकरदार तरुणीने बॅंकेच्या पैशावर मारला डल्ला
पाथर्डी: प्रेमात सैराट झालेल्या व खासगी बॅंकेत नोकरीस असलेल्या तरुणीने बॅंकेतील सुमारे साडे 38 लाख रुपये आणि बारा तोळे सोने प्रियकराबरोबर घेऊन पोबारा केला आहे. या घटनेबाबत मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पाथर्डी पोलिसात दाखल केली आहे.
पाथर्डी शहरातील एका खासगी पतसंस्थेमध्ये नोकरीस असलेली वीस वर्षांची तरुणी रोख रक्कम 38 लाख 34 हजार आणि 12 तोळे सोन्याचे दागिने घेऊन प्रियकरासोबत पसार झाली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील बॅंकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बॅंकेत असलेला खातेदारांचा पैसा आणि सोने तारण ठेवून ग्राहकांनी त्यावर पैसे घेतले आहे. त्या पैशावर आणि सोन्याच्या दागिन्यांवर बॅंकेत काम करणाऱ्या तरुणीने प्रेमात आंधळे होत डल्ला मारून एक प्रकारे चोरी केली आहे.
वास्तविक पाहता या घटनेत नोकरी करणाऱ्या तरुणीने चोरी केली असल्याने चोरीचा गुन्हा बॅंकेच्या जबाबदार व्यक्तीकडून दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता मुलीच्या आईने आपली मुलगी बेपत्ता झाली असून तिच्याकडे 38 लाख 35 हजार रुपये व बारा तोळ्याचे दागिने घेऊन गेल्याच पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केले गेले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.