पंतप्रधान आवास योजना घोटाळ्या प्रकरणी कृषी आयुक्तना ईडीची नोटीस
छत्रपती संभाजीनगरच्या (पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात ईडीने तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
या घरकुल योजनेत 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ईडीने संभाजीनगरमध्ये तब्बल तेरा ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर ईडीन महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली,तत्कालीन महापालिका आयुक्तांची सुद्धा चौकशी केली होती आणि त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीन चौकशीसाठी बोलावले असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनील चव्हाण सद्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.