जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे सेवा निवृत्त
सांगली दि.३१: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे आज सेवानिवृत्त झाले. त्यांनी 1985 साली एम.बी.बी.एस. पदवी घेतली होती. त्यांनी 1992 साली डी.एल.ओ. ही पदवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथून तर पदव्युत्तर पदवी 2000 साली एम.एस.ई.एन.टी. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज, जे.जे.रूग्णालय मुंबई येथून घेतली होती.
डॉ. साळुंखे यांनी शासकीय सेवेत सन 1986 पासून प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय अधिकारी पदस्थापनेपासून प्रारंभ केला होता. तद्नंतर त्यांनी जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या निरनिराळ्या ग्रामिण रूग्णालयामध्ये आरोग्य सेवा दिली. सन 2010 मध्ये एम.पी.एस.सी. अंतर्गत वर्ग-१, जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये पाचव्या क्रमांकाने यश संपादन केले. सन 2016 पासून सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक पदावर ते कार्यरत होते.
डॉ. साळुंखे यांनी जिल्ह्यात कोविड-19 आपत्ती व्यवस्थापनांतर्गत इंन्सिडंट कमांडर, कोविड कंट्रोल म्हणून कार्यभार स्वीकारून आपत्ती व्यवस्थापनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच शासकीय व खाजगी रूग्णालयांसोबत समन्वय साधून रूग्णांना योग्य त्या सर्व सेवा पुरविल्या. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत हृदयरूग्ण बालकांवर मोफत शस्त्रक्रियेकरीता सर्वस्वी प्रयत्न केले. तसेच निरनिराळ्या योजनेतून बालकांवर इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी प्रयत्न केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.