गाडी पुलावरून थेट नदीत कोसळली; लहान बाळासह 3 जणांचा जागीच ठार
नाशिकमधील नांदगाव येथे इको कारचा भीषण अपघात झाला आहे. गाडी पुलावरून थेट नदीत कोसळली आहे. या अपघातात एका लहान बाळासह तिघांचा मृत्यू झाला आहे. नांदगावमधील नाग्यासाक्या धरणासमोरील नांदगाव मालेगाव राज्यमार्गावर ही घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. गाडी नदीवरील कठडे नसलेल्या पुलावरुन थेट नदीत कोसळल्याने अपघात झाला
अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातात एका लहान बाळासह तिघांचा मृत्यू आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातातील जखमी आणि मृतांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.