शासकीय अधिकाऱ्यांना बदल्यांसाठी आता 30जून पर्यंत करावे लागणार वेटिंग
मुंबई : राज्य शासनामाफर्त दरवषीर् एप्रिल आणि मे महिन्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्यात येतात. राज्य उत्पादन शुल्क, पोलिस विभागातील काही वरीष्ठ आयपीएस अधिकारी, उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर दीडशे पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्याशिवाय आरटीओमधील काही अधिकारी, सावर्जनीक बांधकाम, सहकार तसेच अन्य विभागातील बदल्या आतापयर्त करण्यात आल्या आहेत. मात्र आता उवर्रित बदल्यांना दि. ३० जूनपयर्त मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी विद्या भोईटे यांच्या सहीने काढण्यात आला आहे.
राज्य शासनाने यापूवीर् उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. अनेकांनी बदल्यांच्या ठिकाणी कायर्भार स्विकारला आहे. पोलिस विभागातील काही वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच उपअधीक्षकांच्याही मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. अनेक पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या बदल्या अद्यापही झाल्या नाहीत. आता मुदतवाढ दिल्याने या बदल्या जून अखेरीस होण्याची शक्यता आहे. शिवाय सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचेही आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत.
राज्य शासनातील अन्य विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्याही रखडल्या आहेत. सावर्जनीक बांधकाम, आरटीओ, सहकार विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महसूल विभागातीलही काही अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसिलदार प्रवगार्तील अजूनही काही बदल्या झालेल्या नाहीत. मात्र गेली दोन वषेर् रखडलेल्या बदल्यांना पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अधिकाऱ्यांना मुलांच्या शैक्षणिक वषार्ची चिंता
बदल्यांना ३० जूनपयर्त मुदतवाढ दिल्याने अधिकाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक अधिकारी मे अखेरीस बदल्या होतील या आशेवर मानसिक तयारी केली होती. कायर्काल पूणर् झाल्याने जिल्ह्यातून बदली होऊन जाणाऱ्या अधिकाऱ्यांना आता वेगळीच चिंता सतावत आहे. जूनच्या मध्यापयर्त नवीन शैक्षणिक वषर् सुरू होणार आहे. त्यामुळे बदली होणार की नाही याचा निणर्य जून अखेरीस होणार असल्याने मुलांच्या शाळा, कॅलेजचे प्रवेश आहे तिथेच घ्यायचा की बदली झालेल्या ठिकाणी अशा द्विधा मनस्थितीत अधिकारी आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.