Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नव्या संसद भवनच डिझाइन फायनल करणयासाठी बिमल पटेल यांनी घेतली तब्बल 229.75 कोटी रूपये

नव्या संसद भवनच डिझाइन फायनल करणयासाठी बिमल पटेल यांनी घेतली  तब्बल 229.75 कोटी रूपये


या संसद भवनाचं डिझाइन बिमल पटेल यांनी केलं आहे. सध्या त्यांच्या नावाची खूप चर्चा सुरू आहे. भव्यदिव्य आणि डोळे दिपवणारं हे संसद भवन डिझाइन करण्यासाठी त्यांनी किती फी घेतली हे जाणून घेऊया. बिमल हे सध्या अहमदाबाद येथील विद्यापीठाच्या सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आहेत. 2012 पासून या विद्यापीठाचे नेतृत्व करत आहेत. याशिवाय, ते एचसीपी डिझाइन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख देखील आहेत, ज्याची स्थापना त्यांचे वडील हसमुख सी पटेल यांनी 1960 मध्ये केली होती.

गेल्या वर्षी बिमल पटेल यांच्या एसचीपी डिजाइन्सने सेंट्रल विस्टाचं डिझाइन करण्यासाठीच्या लिलावात बोली लावली होती. याचं कंत्राट अखेर त्यांनाच मिळालं. त्यांच्या फर्मला नवीन संसदेसह महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सल्लागार सेवांसाठी 229.75 कोटी रुपये दिले जातील ऑफर केलेल्या सेवांमध्ये प्रकल्पासाठी मास्टर प्लॅन तयार करणे, संरचनांचे डिझाइन, खर्चाचा अंदाज, वाहतूक एकत्रीकरण आणि पार्किंग सुविधा या गोष्टी देण्यात आल्या होत्या. नव्या संसद भवनाचा आकार त्रिकोणी का आहे याचं कारण त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं होतं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे त्रिकोणी भूखंडावर असल्याने तसा आकार देण्यात आला आहे. यामध्ये तीन लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल लाउंजचा समावेश आहे. त्रिकोण हा वेगवेगळ्या देशात आणि संस्कृतीमध्ये शुभ मानला जातो.

बिमल पटेल यांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. 2019 मध्ये पद्म श्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 2003 मध्ये पंतप्रधानांकडून राष्ट्रीय पुरस्कार, 2013 हडको डिजाइन पुरस्कार डिझाइन करण्यात आला आहे. बिमल पटेल यांनी आपलं शालेय शिक्षण सेंट जेवियर्स हाई स्कूल अहमदाबादमधून केलं आहे. बिमल यांनी 1984 मध्ये CEPT, अहमदाबाद येथून आर्किटेक्चरमध्ये डिप्लोमा केला. त्यांनी 1998 मध्ये मास्टर ऑफ आर्किटेक्चर आणि मास्टर ऑफ सिटी प्लॅनिंग पूर्ण केले आणि 1995 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून शहर आणि प्रादेशिक नियोजनात पीएचडी पूर्ण केली. 1990 मध्ये बिमल पटेल त्यांच्या हसमुख पटेल यांच्या कंपनीत रुजू झाले. 1996 मध्ये, बिमलने पर्यावरण नियोजन सहयोगी (EPC) ही ना-नफा सल्लागार आणि धोरण-संशोधन संस्था स्थापन केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.