अबब ही कंपनी देते पक्षांना हाकलण्याची नोकरी; रोज मिळतील 20000 रूपये
जगभरात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच गेल्या काही दिवसांत अनेक कंपन्यांनी आर्थिक संकटामुळे कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता तर सुशिक्षित लोकांनी नोकरीचा फटका बसत आहे. कुटुंब चालवण्यासाठी अनेक जण आपले फील्ड सोडून इतर नोकऱ्या करत आहेत. तरीही अशा अनेक नोकऱ्या आहेत, ज्यात चांगला पगार मिळतो, पण ते काम जरा विचित्रच असते. अशीच एक विचित्र नोकरी आजकाल चर्चेत आहे, याठिकाणचे काम आणि पगार सर्वांनाच चकित करतो.
आता तुम्ही विचार करत असाल की, कंपनी पक्ष्यांना हाकलण्यासाठी एवढा पैसा खर्च करायला का तयार आहे? तर याचे कारण म्हणजे कंपनी फिश चिप्स बनवते. अशा परिस्थितीत कंपनीला मासे साठवून ठेवावे लागतात, परंतु सीगल पक्षी ते मासे चोरून खातात. यादरम्यान पक्ष्यांनी कर्मचाऱ्यांवरही हल्ला केल्याचे दिसून आले. त्यामुळे कंपनीने असे कर्मचारी नेमण्याची घोषणा केली, जे त्या धोकादायक पक्ष्यांना हाकलून देऊ शकतील आणि या कामासाठी कंपनी दररोज 20 हजार रुपये देण्यास तयार आहे.वृत्तानुसार, अनेकांनी या नोकरीसाठी अर्जही केला होता, परंतु सीगलला हाकलून देऊ शकत नसल्याने कोणाचीही निवड झाली नाही. फक्त एका व्यक्तीने त्यांना पळवून लावले, ज्याचे नाव कोरी आहे. तो गरुडाचा पोशाख परिधान करून आला होता, त्यामुळे सीगल तेथे आले नाहीत असे दिसून आले. कंपनीला कोरी यांची कल्पना खूप आवडल्याचे सांगण्यात येते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.