Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10 हजाराची लाच घेणार्‍या महिला तलाठ्यासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

10 हजाराची लाच घेणार्‍या महिला तलाठ्यासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात


छत्रपती संभाजीनगर : वाळू वाहतूकीचा हप्ता म्हणून 10 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने महिला तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीला अटक केली आहे.  सायली राजेंद्र विटेकर (31, पद - तलाठी, रा. सिडको एन-8, छत्रपती संभाजीनगर) आणि सुधाकर नलावडे (रा. शेखपूर, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना 2 टॅक्टरने अवैधरित्या वाळूची वाहतूक करू देण्यासाठी प्रत्येकी एका ट्रॅक्टरचा 5 हजार रूपये हप्ता त्याप्रमाणे 2 टॅक्टरचे 10 हजार रूपये द्या अशी मागणी तलाठी सायली राजेंद्र विटेकर यांनी केली. सुधाकर नलावडेने सरकारी पंचासमक्ष 10 हजार रूपये लाच घेतली. त्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांना अटक करून त्यांच्याविरूध्द खुलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक किरण बिडवे, पोलिस हवालदार जमदाडे,पोलिस हवालदार घायवत, पोलिस अंमलदार देठे आणि पोलिस शिपाई बुजाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.