Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय राऊत यांना बिष्णोई गँग कडून जीवे मारण्याची धमकी

संजय राऊत यांना बिष्णोई गँग कडून जीवे मारण्याची धमकी 



मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यता आली आहे

जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यता आली आहे. 'लॉरेन्स के और से मॅसेज है.. सलमान और तू फिक्स. तयारी करके रखना'. असं या मॅसेजमध्ये म्हटलं आले. मॅसेजमध्ये नेमकं काय म्हटलं? संजय राऊत यांना आलेल्या या धमकीच्या मॅसेजमुळे खळबळ उडाली आहे.

हा धमकीचा मॅसेज राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. 'हिंदूविरोधी असल्यामुळे मारून टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप मारू.. लॉरेन्स के और से मॅसेज है.. सलमान और तू फिक्स..तयारी करके रखना..' असं या मॅसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.