UPI चा वापर करणाऱ्यांना आता ₹ 2000 वरील व्यवहारांवर लागणार PPI चार्ज
नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) च्या माध्यमाने ट्रांझॅक्शन करणे महाग होऊ शकते. नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI च्या माध्यमाने केल्या जाणाऱ्या मर्चंट ट्रांझॅक्शनवर प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्स (PPI) फीस लागू करण्यास सांगितली आहे. संबंधित सर्क्युलरनुसार 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या UPI ट्रांझॅक्शनवर चार्ज लागेल. हा चार्ज मर्चेंट ट्रांझॅक्शंस अर्थात व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युजर्सना द्यावा लागेल.
किती लागणार चार्ज -
बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्सच्या (PPI) माध्यमाने UPI पेमेंटवर 1.1 टक्का इंटरचेन्ज फीस लागेल. महत्वाचे म्हणजे, PPI मध्ये व्हॉलेट अथवा कार्डच्या माध्यमाने ट्रांझॅक्शन येते. इंटरचेन्ज फीससंदर्भात बोलायचे झाल्यास, ही सर्वसाधारणपणे कार्डच्या माध्यमाने केल्या जाणाऱ्या ट्रांझॅक्शनशी संबंधित आहे आणि देवाण घेवाण स्वीकार करणे, प्रोसेसिंग अथवा मंजूरीसाठी लागणारा खर्च कव्हर करण्यासाठी आकारली जाते.
बँक खाते आणि PPI व्हॉलेट यांच्यात पीअर-टू-पीअर (पी2पी) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (पी2पीएम) ट्रांझॅक्शन इंटरचेन्ज करण्याची आवश्यकता नसते. NPCI चा हा प्रस्ताव आगामी 1 अप्रिलपासून प्रभावी आहे. NPCI कडून 30 सप्टेंबर 2023 अथवा या पूर्वी याची समीक्षा केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.