GPS सिस्टम मुळे बायकोला पकडले नवर्याने
कारमधील 'जीपीएस' प्रणालीमुळे पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचे बिंग फुटल्याचे प्रकरण कर्नाटकच्या बंगळुरूमधून समोर आले आहे. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध स्थानिक न्यायालयात धाव घेतली आणि कोर्टाच्या आदेशानुसार दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याचे २०१४ मध्ये लग्न झाले. दोघांना ६ वर्षांची मुलगीही आहे. तो रात्रपाळीत काम करायचा आणि कारमधील जीपीएसचा डेटा तपासेपर्यंत सर्व सुरळीत होते. 'मी २०२० मध्ये कार खरेदी केली. त्यात स्मार्टफोनशी जोडलेली जीपीएस प्रणाली होती.घरात कुणालाही याबाबत सांगितले नव्हते.
एके दिवशी रात्रपाळीसाठी कामावर असताना कोणीतरी घरून गाडी बाहेर नेल्याचे लक्षात आले. जीपीएस तपासल्यावर कार एका हॉटेलबाहेर थांबल्याचे दिसत होते. पहाटे ५ च्या सुमारास कार पुन्हा घरी होती. मी हॉटेलला भेट दिल्यावर पत्नी आणि तिच्या प्रियकराने मतदार ओळखपत्र दाखवून एक रूम बुक केली होती, हे समजले,' असे त्या व्यक्तीने सांगितले.जीपीएस डेटा दाखवून जाब विचारल्यावर दोघांनी गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्याला दिली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार, पोलिसांनी आयपीसीच्या ४२०, ४१७ अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर, पत्नीलाही नोटीस बजावण्यात आली आहे, ती सध्या राज्यातील दुर्गम जिल्ह्यात राहत आहे. दरम्यान, ही बातमी व्हायरल झाली असून, तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे याबाबत नेटकऱ्यांमध्ये रंजक चर्चा रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.