Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधींना कोर्टात खेचणार.. ट्विट करून मोदींनी दिला इशारा..

राहुल गांधींना कोर्टात खेचणार.. ट्विट करून मोदींनी दिला इशारा..


नवी दिल्ली : आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधींच्या 'मोदी आडनाव 'च्या विधानाबाबत ललित मोदी यांनी यूकेमधील न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ललित मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. वास्तविक, ललित मोदींचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा राहुल गांधी यांना नुकतेच मोदी अपमान प्रकरणी दोषी ठरवून गुजरातच्या न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींना संसदेतून अपात्र ठरवण्यात आले आणि त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. या कारवाईपासून काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असून अनेक आरोप करत आहे. ललित मोदींनी एकामागून एक ट्विट केले आहेत. मला कोणत्या आधारावर फरार म्हटले जात आहे, मला कधीच दोषी ठरवण्यात आलेले नाही असा प्रश्न मोदी यांनी केला.

ललित मोदी म्हणाले की, विरोधकांकडे काहीच काम नाही, त्यामुळे एकतर ते चुकीची माहिती ठेवतात किंवा सूडाच्या भावनेने असे करतात. मी राहुल गांधींना ताबडतोब ब्रिटनमधील न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की त्यांना काही ठोस पुरावे समोर आणावे लागतील.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये देशातील अनेक त्यांना टॅग करत गांधी परिवाराची विदेशात किती संपत्ती आहे याचा पुरावा माझ्याकडे असल्याचे म्हटले आहे. माझ्याकडे सर्व पुरावे आणि पत्ते आहेत. मी पुराव्यासाठी या सर्व मालमत्तांचे फोटो आणि पत्ते पाठवू शकतो. देशातील जनतेला मूर्ख बनवू नका, देशावर राज्य करण्याचा आपला हक्क आहे, असे गांधी परिवाराला वाटते, असेही मोदी यांनी म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.