भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश पाटील कॉंग्रेस कमिटी सांगली येथे आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची व पदाधिका-यांची संवाद बैठक आयोजित केली होती.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते श्री. राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची लोकसभेतील सदस्यता हुकूमशाही पद्धतीने रद्द करून देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हे खूप मोठे षडयंत्र आहे. विरोधी पक्षाला चुकीची वागणुक दिली जात आहे अशा आव्हानांना पेलवत आपणाला पुढे जावे लागणार आहे.
यावेळी माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज (बंटी) पाटील यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या कॉंग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नुकतेच मनसे मधुन कॉंग्रेस मध्ये प्रवेश केलेले “आशिष कोरी” यांची सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या “सरचिटणीस (संघटन)” पदी नियुक्ती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली. त्याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.कॉंग्रेस कमिटी, सांगली येथे आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत भाजप मधुन संजय शिंदे, गणेश उर्फ प्रशांत दिवाकर कांबळे, संजय वसंत मोरे, संतोष काशीनाथ खांडेकर व मनसेचे केतन कांबळे यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. विशाल पाटील, डीसीसी बॅंक उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, नगरसेवक संतोष पाटील, मंगेश चव्हाण, महेश साळुंखे, रविंद्र वळवडे, संजय कांबळे, बाबासाहेब कोडग, सुभाष खोत, प्रदेश प्रतिनिधी प्रा. सिकंदर जमादार, मालन मोहिते, बाबगोंडा पाटील, सुरेश गायकवाड, सचिन चव्हाण, डी. पी. बनसोडे, सलिम मुल्ला, आशिष कोरी, सुभाष खोत, उत्तम सुर्यवंशी, सनी धोतरे, रविंद्र खराडे, आयुब निशानदार, अमित पारेकर, अमित बस्तवडे, माणिक कोलप, कपिल कबाडगे, मौला वंटमोरे, अल्ताफ पेंढारी, अशोकसिंग रजपुत, राजेंद्र कांबळे, आशिष चौधरी, प्रकाश जगताप, सौरभ पाटील, पैगंबर शेख, सुनिल शेळके, सदाशिव वाघमारे, अजित ढोले, अरविंद जैनापुरे, शरद चव्हाण, देवानंद जमगी, अमोल पाटील, श्रीनाथ देवकर, बंडु पाटील, धनु खांडेकर, आदि मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.