आज सकाळी कोल्हापूरात मोदी हटाव चे बॅनर लावले
कोल्हापूर- आज सकाळी कोल्हापूर शहरात 'मोदी हटाव, देश बचाव' अशा आशयाचे बॅनर लावले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात खळबळ माजलीय. आज सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हे बॅनर चर्चेचा विषय बनलेले आहे. बॅनर कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी दिल्लीत 'आप'ने लावलेल्या बॅनर सारखे दिसणारे हे बॅनर असल्याचे समजते.
देशात राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या अदाणी समूहाच्या कथित घोटाळ्यामुळे संसदेत सुरू असलेला गदारोळ, राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकीने काढून घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच अशा आशयाचे बॅनर कोल्हापुरात लागल्याने खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.