मंडल अधिकारी लाचलुचपतचया जाळ्यात
वडिलोपार्जित मिळकतीवर सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करून ते मंजूरीसाठी पाठवण्याकरीता 25 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील दोघांनी रंगेहात पकडले आहे.
उल्हास मुरुडकर आणि संतोष मोघे अशी त्यांची नावे आहेत.
तक्रारदाराचे नाव वडिलोपार्जित शेतजमीनीवर दाखल करण्याकरीता आणि त्याची मंजूरीकरीता पाठवण्याकरीता कानकडी तलाठी राजा येथील संतोष मोघे याने मोबाईल फोनची मागणी केली. आणि ती नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी उल्हास मुरुडकर याने 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना उल्हास मुरुडकर याला रंगेहात पकडण्यात आले. तसेच संतोष मोघे यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रवीण चाटे, हवालदार संतोष कुळये, नाईक दीपक आंबेकर, हेमंत पवार, राजेश गावकर, प्रशांत कांबळे यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.