Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली सिव्हीलमध्ये रूग्णांच्या आरोग्याशी खेळ घाणीचे साम्राज्य....

सांगली सिव्हीलमध्ये रूग्णांच्या आरोग्याशी खेळ घाणीचे साम्राज्य....


स्वच्छतेसाठी निधीच नसल्याने ठेकेदाराने काम थांबवले 

सांगली : सांगलीतील शासकीय रूग्णालय अथार्तच सिव्हील हॅस्पिटलमध्ये रूग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. हॅस्पिटलमध्ये ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर ड्रेनेज तुंबल्याने परिसरात दुगर्धी पसरली आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दरम्यान सिव्हील प्रशासनाकडे निधी नसल्याने ठेकेदाराने काम थांबवल्याचे सांगण्यात येत आहे. 

दक्षिण महाराष्ट्रासह कनार्टकातील गोरगरीब रूग्णांचा आधार म्हणून सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलची ओळख आहे. या हॅस्पिटलमध्ये दररोज सुमारे एक हजार ते दीड हजार रूग्ण बाह्यतपासणी विभागात उपचारासाठी येत असतात. शिवाय अडीचशे ते तीनशे रूग्ण उपचारासाठी आंतररूग्ण विभागात दाखल आहेत. या रूग्णांना हॅस्पिटल परिसरातील घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. 


हॅस्पिटल परिसरातील ड्रेनेजची झाकणे नसून ड्रेनेजचे पाणी सवर्त्र पसरले आहे. शिवाय विविध प्रकारचा वैद्यकीय कचऱ्याचे ढीगही लागले आहेत. घाणीच्या या साम्राज्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. डुकरांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे हॅस्पिलटमधील रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निमार्ण झाला आहे. 

रूग्णालयाचे अधिष्ठाता आजारी असल्याने रजेवर आहेत. सध्या त्याचा प्रभारी कायर्भार देण्यात आला आहे. त्यामुळे सिव्हीलमधील सारीच यंत्रणा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. रूग्णांच्या समस्यांकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.