पुण्यातील एका खून प्रकरणात फाशी झालेल्या सवोर्च्च न्यायालयाने निदोर्ष सोडले आहे.
नारायण चेतनराम चौधरी असे निदोर्ष सोडण्यात आलेल्याचे नाव आहे. तो मूळचा राजस्थान येथील आहे. पुण्यात १९९४ मध्ये एका गभर्वती महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून करण्यात आला होता. त्याप्रकरणी चौधरीसह जितेंद्र गहलोत आणि एकास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या खटल्याच्या सुनावणीवेळी चौधऱी याने खुनाची घटना घडली तेव्हा आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र न्यायालयाने त्याला सज्ञान समजून यातील तीनही संशयितांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
त्यानंतर त्यानंतर चौधरी आणि गहलोत यांनी राष्ट्रपतींकडे शिक्षेविरोधात दयेचा अजर् दाखल केला होता. नंतर चौधरी याने तो अजर् मागे घेतला होता. नंतर त्याने सवोर्च्च न्यायालयात रिव्ह्यू पिटीशन दाखल केली. त्यानंतर सवोर्च्च न्यायालयाने यातील सत्य शोधण्याचे अदेश दिले होते. पुण्यातील न्यायालयाच्या तपासणीत त्याचे राजस्थान येथील एका शाळेचे प्रमाणपत्र सापडले. त्यावरून त्याचे वय निश्चीत झाले. त्यानंतर पुणे न्यायालयाने त्यांचा सीलबंद अहवाल २०१९ मध्ये सवोर्च्च न्यायालयात दिला होता. पुणे न्यायालयाच्या अहवालात त्याचे वय निश्चीत झाले होते. तसेच खुनाच्या घटनेवेळी तो १२ वषार्चा होता हेही स्पष्ट झाले. त्यानंतर सवोर्च्च न्यायालयाने आज त्याची निदोर्ष मुक्तता केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.