क्रिप्टो करन्सीतून जादा परताव्याचे आमिष समडोळीच्या एकावर गुन्हा
सांगली: डॅक्सी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून लोकांना दुप्पट लाभाचे आमिष दाखवून १३ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी समडोळीच्या एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दि. २७ माचर् रोजी भिलवडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. डॅक्सी क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन असल्याचे माहित असूनही ही फसवणूक केल्याचे फियार्दीत म्हटले आहे.
भिमगोंडा ऊफर् सन्मती कुमगोंडा पाटील (रा. समडोळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन असल्याचे माहित असूनही पाटील याने स्वतच्या आथिर्क स्वाथार्पोटी लोकांकडून रक्कम स्विकारण्याचे अधिकार नसताना त्याने सांगली जिल्ह्यातील अनेकांकडून रोख रक्कम स्विकारली आहे. ती रक्कम डॅक्सी नावाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दहा महिन्यांत रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष पाटील याने गुंतवणूकदारांना दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडून रोख रक्कम स्विकारली.रक्कम स्विकारल्यानंतर त्याने गुंतवणुकदारांना त्यांच्या मोबाईलवर क्रिप्टोकरन्सीचे आयडी आणि डॅक्सी नावाचे क्रिप्टोकरन्सीचे क्वाईन दिले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना दिलेल्या हमीप्रमाणे त्यांची गुंतवणुकीची रक्कम तसेच त्याचा परतावा दिलेला नाही. शेअर माकेर्ट, क्रिप्टोकरन्सी आदीद्वारे लोकांची होणारी फसवणूक रोखण्याकरता पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली यांनी कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आथिर्क गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, अमोल लोहार, विनोद कदम, दीपाली पाटील यांनी ही कारवाई केली आहे. शेअर माकेर्ट तसेच क्रिप्टोकरन्सी तसेच अन्य माध्यमांद्वारे फसवणूक झाली असल्यास सांगलीतील आथिर्क गुन्हे शाखेकडे संपकर् साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.