३८४ औषधे १२ टक्क्यांनी महागणार; हृदयविकार, मधुमेहाच्या रुग्णांना फटका
नवी दिल्ली : हृदयविकार व मधुमेहासह अनेक आजारांवरील औषधांच्या किमती येत्या १ एप्रिलपासून १२ टक्के वाढण्याची शक्यता आहे. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी दरवाढ ठरणार आहे. १ हजार फॉर्म्युलेशनच्या ३८४ औषधांच्या किमती १२.२ टक्के वाढविण्याची परवानगी देण्याचा विचार सरकार करीत आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या वाढीमुळे हा निर्णय घेतला जात आहे.
राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरणाच्या सहयोगी आयुक्त रश्मी टहलियानी यांनी सांगितले की, २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये घाऊक किंमत निर्देशांक १२.१२ टक्के वाढला आहे. त्यामुळे २७ आजारांवरील ९०० पेक्षा अधिक फॉर्म्युलेशनच्या (वापरयोग्य औषधी) किमती १२ टक्के वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महाग होणाऱ्या औषधांत विविध प्रकारची वेदनाशामक औषधी, संसर्गरोधके, प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) यांसह हृदयविकार व मधुमेहांवरील औषधांचा समावेश आहे.
सलग दुसऱ्या वर्षी किमतीत वाढ
बिगर-सूचीबद्ध (नॉन-शेड्यूल्ड) औषधांच्या किमतीत १० टक्के वाढ करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी औषधाच्या किमती १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढणार आहेत. गेल्या वर्षी औषधांच्या किमतींमध्ये ११ टक्के वाढ करण्याची परवानगी देण्यात आली होती. बिगर-सूचीबद्ध (नॉन-शेड्यूल्ड) औषधांच्या किमतीत १० टक्के वाढ करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी औषधाच्या किमती १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढणार आहेत. गेल्या वर्षी औषधांच्या किमतींमध्ये ११ टक्के वाढ करण्याची परवानगी देण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.