Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज

सभागृहात पॉर्न पाहणाऱ्या भाजप आमदारावर संतापले अभिनेता प्रकाश राज


नवी दिल्ली: नुकतेच त्रिपुरामधील भाजपचे आमदार जादब लाल नाथ हे चक्क सभागृहातच पॉर्न व्हिडिओ पाहताना आढळून आले आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते त्यांच्या फोनवरच पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचे दिसत आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता यावर संपूर्ण देशभरातुन प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी देखील याबाबत भाष्य केले आहे.

आमदार थेट सभागृहात पॉर्न पाहत असलेला व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियावर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ‘ब्लु जेपी शेम’ असं कॅप्शन देत प्रकाश राज यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी आपली मते मंडळी आहेत. यावर देखील आता चित्रपट बनवा अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्या एकाने अशा लोकांचं निलंबन का होत नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने सभागृहात असे वर्तन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील अशा घटना समोर आलेल्या आहेत.

व्हिडीओ पाहणाऱ्या आमदाराने दिले हे स्पष्टीकरण

यावर आमदार जादब लाल नाथ यांनी "सभागृहात मोबाईल फोन वापरण्यास मनाई असल्याचे मला माहित आहे. पण माझ्या फोनवर वारंवार कॉल येत होते. मी कॉल घेतला आणि नंतर माझ्या फोनवर अश्लील व्हिडीओ येऊ लागले. त्यानंतर मी ते बंद केले," असे स्पष्टीकरण दिले. सध्या यावर अनेकजण संताप व्यक्त करत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.