Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार यांची टोलेबाजी; तुमच्या काकाने..

अजित पवार यांची टोलेबाजी; तुमच्या काकाने..


हा कसला आनंदशिधा आहे? या आनंदशिध्यात गोरगरीबाने आपले कुटुंब चालवायचे कसे? गुढीपाडव्यापासून आंबेडकर जयंतीपर्यंत आनंदशिधा देण्याचे नियोजन आहे. मात्र सत्ताधारीच तिकडे आनंद घेत आहेत. आनंदशिद्यामध्ये केवळ एक किलो धान्य मिळणार आहे. एक किलो धान्य महिनाभर यांच्या काकाने खाल्ले आहे का? एक किलोमध्ये त्यांचे कुटुंब केवळ एकच महिना त्यात चालवून दाखवावे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात गोरगरीबांची चेष्टा, मस्करी चालू आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मिंधे सरकारवर सडकून टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचे डोळे उघडले

शिंदे-फडणवीस याचे सरकार नऊ महिन्यांपूर्वी सत्तते आले. नुकत्याच झालेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एक जागा कशीबशी त्यांना जिंकता आली. बाकी सगळीकडे ते पडले. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले. कसबा पेठेत 28 वर्षांपासून भाजप निवडून येत आहे. तेथे ते पडले. चिंचवडमध्येही मविआतून एक उमेदवार फुटून तो उभा राहिला. अन्यथा तेथेही मविआचा 10 ते 12 हजार मतांनी सहज विजय झाला असता, असे अजित पवार म्हणाले.

फोडाफोडीचे राजकारण

शिंदे गट आणि भाजपला आता हे कळून चुकले आहे की, आपण एकत्रित सरकार आणले तरी लोकांना ते मान्य झालेले नाही. फोडाफोडीचे राजकारण जनतेला पटलेले नाही. राज्याच्या इतिहासात अशा पद्धतीने तोडफोड करून यापूर्वी सरकार आणलेले नव्हते. याबाबत अजूनही सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. म्हणजेच हे सरकार अधांतरी आहे. सरकारवर कायद्याचा बडगा आहेच, असेही अजित पवार म्हणाले.

सरकारकडून रोज जाहिराती

अजित पवार म्हणाले, सत्तेत आल्यापासून शिंदे-फडवणीस सरकारकडून रोज जाहिराती दिल्या जात आहेत. हे सरकार जनतेचे काम करायला आले आहे की जाहिराती करायला? एखाद्या सणाच्या दिवशी जाहिराती दिल्या तर समजू शकतो. मात्र शिंदे-फडणवीस सरकारची रोजरोज जाहिरात येत आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पुढील निवडणुकीत पराभवाची धास्ती आहे. म्हणूनच हे उपद्व्याप सुरू आहेत. म्हणे, निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान… कसला बोडख्याचा गतिमान. यांचे जाहिरातीतील फोटोपासून पेपरचे पान बदलावे लागतेय, असा टोलाही पवार यांनी हाणला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.