सुशीलकुमार शिंदे यांना मोठा धक्का..
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पुन्हा धक्का बसला आहे. शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या युवा कार्यकर्त्याने मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता सोलापूरचे माजी खासदाराने काँग्रेसला रामराम ठोकला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कमकुवत होणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यांसमोर भाजपबरोबर आता भारत राष्ट्र समितीचे आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानांचा सामना काँग्रेस कसे करणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
कोणी दिला सुशीलकुमार शिंदे यांनी धक्का
सोलापूरचे काँग्रेसचे माजी खासदार धर्माण्णा सादुल यांचा काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्ती आणि काँग्रेसचे माजी खासदार धर्माण्णा सादुल यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भारत राष्ट्र समितीची वाट धरली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना मला दुःख होत आहे. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे मी राजीनामा देत असल्याचे धर्माण्णा सादुल यांनी म्हटलेय. ते म्हणाले की, पक्षाने मला भरपूर दिले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल मला आदर आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानत पत्राद्वारे माझ्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. तो मंजूर करावा” अशी विनंती पक्षाला केलीय.
शहराध्यक्षांकडे दिला राजीनामा
काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे धर्माण्णा सादुल यांनी राजीनामा दिलाय. आता माजी खासदार धर्माण्णा सादुल हे लवकरच भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे सोलापुरात काँग्रेससमोर भाजप आणि भारत राष्ट्र समितीचे आव्हान उभे राहणार आहेत.
कोण आहेत सादुल
धर्माण्णा सादुल हे काँग्रेसचे माजी खासदार आणि सोलापूरचे माजी महापौर आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी वेगळी वाट निवडलीय. ते लवकरच भारत राष्ट्र समितीत दाखल होणार आहे. सोलापुरात भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर राव यांची सभा होणार असून त्यात त्यांचा प्रवेश होणार आहे.
मागील आठवड्यात यांनी दिला धक्का
सोलापुरातील दादा प्रतिष्ठानचे प्रमुख आणि युवा नेते उदयशंकर पाटील यांनी मागील आठवड्यात भाजपत प्रवेश झाला होता. यामुळे सोलापुरात भाजपचे मिशन 2024 चे सुरु झाले आहे. श्रीकांत भारतीय यांनी उदयशंकर पाटील यांना भाजपमध्ये येण्यासाठी गळ घातली होती. अखेरी त्यात ते यशस्वी ठरले. उदयशंकर पाटील व आता धर्माण्णा सादुल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे सोलापूरच्या राजकारणातील समीकरणे बदलणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.