Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत शहीद अशोक कामटे इंटरनॅशनल मॅरेथॉन प्रचंड उत्साहात संपन्न

सांगलीत शहीद अशोक कामटे इंटरनॅशनल मॅरेथॉन प्रचंड उत्साहात संपन्न


सांगलीमधील पोलिस मुख्यालयाच्या चौकात प्रचंड उत्साहात दहावी शहीद अशोक कामटे इंटरनॅशनल मॅरेथॉन प्रचंड उत्साहात संपन्न झाली. यामध्ये 5 हजार स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांनी भाग घेतला. पहाटे पाच वाजता 21 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेला सुरुवात झाली. पाच किलोमीटर स्पर्धेचे उद्घाटन सकाळी आठ वाजता संपन्न झाले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, भाजप नेते शेखर इनामदार, महापालिका आयुक्त सुनील पवार तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्तांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशन प्रमुख सुमित कदम यानी सर्वांचे आभार मानले. मॉर्निंग ग्रुपने व बसापा हलवाईने सर्व स्पर्धकांसाठी अल्पोपहाराची सोय केलेली होती.

सांगली व मिरजेतील पोलीस वाहतूक शाखेने तो उत्तम बंदोबस्त ठेवला होता .शहीद अशोक कामटे स्मृती फाऊंडेशनचे शेकडो कार्यकर्ते उत्साहाने कार्यरत होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झुंबा नृत्याचेही आयोजन स्पर्धकाच्या मनोरंजनासाठी करण्यात आले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.